Friday, September 21, 2012

Humen Digram


मुतखडा

E-mail Print PDF
मुतखडे निर्माण होणे म्हणजे काय?
इंग्लिशमध्ये मुतखड्यात (Kidney Stones) आणि Nephrolithiasis अशी दोन नावे आहेत. म्हणून Nephrolithiasis म्हणजे मुतखडा.

हा सामान्य आहे काय?
लोकसंख्येच्या १ ते ५ टक्के च्या दरम्यान लोकांवर याचा परिणाम होतो.

एखाद्या व्यक्तीत सारखे हे खडे निर्माण होऊ शकतात काय?
५० ते ८० टक्के रूग्णांमध्ये हे खडे पुन्हा निर्माण होतात.

मूतखडे असणारे रूग्ण कसे दिसतात? किंवा मूत्रवाहक नलिकेत होणार्‍या पीडेमुळे उद्‌भवणारी पोटदुखी म्हणजे काय?
मूत्रपिंडातून मूत्राशयाकडे मूत्र वाहून नेणार्‍या नलिकेचे आकुंचन होणे जे मुतखड्याचा क्षोभ झाल्यामुळे होते त्याला Renal Colic म्हणतात. ही पोटदुखी साधारण पणे बाजूच्या क्षेत्रात (flank area) सुरू होऊन नंतर ती जांघ, पोट व मांडी यांच्यामधल्या खोलगट भागात जाते. खडा किंवा गाठ वाहून गेल्यानंतर दुखणे कमी होते, पण लघवीवाटे रक्त पडू शकते. जर संसर्ग झाला तर ताप येणे, मूत्रोत्सर्जनात अडथळे आणि मूत्रोत्सर्जन जास्त वेळा होणे ही लक्षणे दिसून येतात.

मुतखड्यावर कोणते उपचार केले जातात?
यावरचे उपचार खडा कोणत्या प्रकारचा आहे, त्यावर अवलंबून असतात, म्हणून जेव्हा शक्य असेल तेव्हा हा खडा तपासणीसाठी द्यावा. खालील कारणांमुळे खडे कमी होऊ शकतात.
  1. लघवीचा Volume राखण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे
  2. जर आतड्यात कॅल्शियम चे शोषण होते आहे अशी शंका असेल तर दुधाच पदार्थ आणि इतर कॅल्शियम जास्त असलेले पदार्थ खाण्याचे टाळले पाहिजे.
  3. जास्त मीठ टाळले पाहिजे, जर खड्यात कॅल्शियम असेल तर सोडियम घेण्याचे प्रमाण वाढून ते कॅल्शियम शरीराबाहेर टाकते.
  4. कॅल्शियम ऑक्सलेट खडे असतील तर हिरव्या पालेभाज्यांसारखे ऑक्सलेट असलेले अन्नपदार्थ खाणे टाळले पाहिजे.
मुतखडे निर्माण होत असतील तर त्यांचा संपूर्ण अभ्यास केला पाहिजे. या तपासणीत संपूर्ण Metofolic Profile आणि कॅल्शियम, यूरिक ऍसिड, ऑक्सीलीटेट, सायट्रेट इ. चे २४ तासाच्या लघवीद्वारे बाहेर टाकण्याचे प्रमाण मोजणे.

मुतखड्याचे वेगवेगळे प्रकार कोणते?
मुतखडे खालील प्रकारचे असतात
  1. कॅल्शियम फॉस्फेट
  2. कॅल्शियम ऑक्सालेट
  3. युरिक ऍसिड
  4. मॅग्नेशियम अमोनियम फॉस्फेट (Struvite)
मुतखडे कसे निर्माण होतात?
खालील कारणांमुळे
  1. कमी पाणी पिणे.
  2. जठर व आतड्यांमधून कॅल्शियमचे वाढत्या प्रमाणात शोषण.
  3. कॅल्शियमची गळती असणारे मूत्रपिंड ज्याला Hypercalciurea म्हणतात.
  4. ऑक्सलेटचे वाढत्या प्रमाणात शोषण.
  5. लाल मांसामध्ये आढळणार्‍या प्रथिन पदार्थांच्या घटकांचे सेवन ३ ते ५ टक्के रूग्णांमध्ये कोणतेही कारण सापडत नाही.